दिवसभरात कोरोनाचे ८९ रुग्ण वाढले; ६५ बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 06:59 PM2020-09-28T18:59:53+5:302020-09-28T19:00:04+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६८, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २१ असे एकूण ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३१८ झाली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची गती किंचितसी कमी झाली असून, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६८, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २१ असे एकूण ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३१८ झाली आहे. दरम्यान, रविवारी कोरोनामुळे निधन झालेल्या एक रुग्णाची सोमवारी नोंद घेण्यात आल्यामुळे मृतकांचा आकडा वाढून २२६ वर पोहचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १० जणांसह सिंधखेड, गौरक्षण रोड, विठ्ठल नगर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, सिव्हील लाईन, वडाळी देशमुख, अकोट, तेल्हारा, शास्त्री नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, टी फॅक्टरी, पोळा चौक, बोरगाव मंजू, बाळापूर, लहान उमरी, अकोली जहागीर, गोडबोले प्लॉट, गोकूल कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, जोगळेकर प्लॉट, मलकापूर, डाबकी रोड, जठारपेठ, शिवाजी नगर, कपिला नगर, व्यकेटेश नगर, शास्त्री नगर, पिंपरी, धामोरी, भगोरा, सिरसो, निर्सग अर्पाटमेन्ट व गुडधी येथील प्रत्येकी एक अशा ५९ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी कौलखेड येथील तीन जणांसह बस स्टँड मागे, महसूल कॉलनी, दुर्गा चौक, शिवाजी नगर, गोरेगाव, कोठारी वाटीका येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रविवारच्या मृतकाची सोमवारी नोंद
सोमवारी कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या पतीचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची नोंद सोमवारच्या अहवालात घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या २२६ झाली आहे.
६५ कोरोनामुक्त
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २९, कोविड केअर सेंटर अकोला येथून २१, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून १० अशा एकूण ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१,५९५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,३१८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५४९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५९५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.