सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याचे ढीग; महापालिका झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:47 PM2018-11-09T13:47:57+5:302018-11-09T13:48:09+5:30
अकोला: दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे अकोलेकरांना नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे.
अकोला: दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे अकोलेकरांना नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा पाहता अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाºया सत्ताधारी भाजपाला कर्तव्याचा विसर पडल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.
दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध साहित्याची विक्री करण्यासाठी बाहेरगावचे व्यावसायिक, फूल विके्रता दाखल झाले होते. दीपावलीच्या रात्री ८ वाजेपर्यंत व्यावसायिकांनी गाशा गुंडाळला. साहजिकच रस्त्यांवर केळीची पाने, सडकी फुले, प्लास्टिक पिशव्यांसह विविध प्रकारचा कचरा साचला होता. मुख्य मार्गांवरील कचरा त्याच रात्री उचलणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना शक्य होते; परंतु सद्यस्थितीत महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्याचा गैरफायदा घेत गुरुवारी दुपारपर्यंतही मुख्य रस्त्यांलगत कचरा तसाच पडून असल्याचे चित्र समोर आले. हा प्रकार पाहता मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन तसेच आरोग्य निरीक्षक कोणते कर्तव्य निभावत होते, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.
आरोग्य निरीक्षकांवर कारवाई नाहीच!
महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचारी असो किंवा पडीत प्रभागातील खासगी कर्मचाºयांच्या दैनंदिन साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची आहे. शहरात कचºयाचे ढीग साचले असताना आरोग्य निरीक्षक झोपा काढतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कामचुकार आरोग्य निरीक्षकांवर सत्ताधारी भाजपाने कधी कोणत्याही कारवाईची शिफारस केल्याचे ऐकिवात नाही.
घंटा गाडी चालकांवरील नियंत्रण सुटले!
शहरात दैनंदिन २४० टन कचरा तयार होतो. त्यामध्ये प्रत्येक घर, दुकाने, बाजारपेठ आदींचा समावेश आहे. हा कचरा जमा करण्यासाठी मनपाने घंटा गाडीची व्यवस्था केली असून, नायगावस्थित डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक क रणे अपेक्षित आहे. काही घंटा गाडी चालक तसे न करता स्वत:च्या सोयीनुसार त्या-त्या प्रभागातील खुल्या जागांवर कचºयाची साठवणूक करीत आहेत. मध्यंतरी सायंकाळी घराबाहेर फिरण्यासाठी निघालेल्या जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील एका नागरिकाला घंटागाडी चालकाने जोरदार धडक दिली. दुसºया घटनेत खदान परिसरात स्थानिक रहिवाशांनी घंटागाडीची तोडफोड केली. एकूण प्रकार पाहता मनपाच्या मोटार वाहन विभागाचे घंटा गाडी चालकांवर अजिबात नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.