पावसाळ्यात डासांचा उच्छाद, मलेरियाचे रुग्ण वाढले

By सचिन राऊत | Published: July 18, 2024 07:46 PM2024-07-18T19:46:27+5:302024-07-18T19:47:08+5:30

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार असून तो प्लास्मोडिअम नावाच्या परजिवींमुळे होताे.

During the rainy season, mosquito breeding, malaria cases increased | पावसाळ्यात डासांचा उच्छाद, मलेरियाचे रुग्ण वाढले

पावसाळ्यात डासांचा उच्छाद, मलेरियाचे रुग्ण वाढले

अकाेला : शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मलेरियाच्या रुग्णांमध्ये गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती आराेग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मलेरिया व हिवतापाचे रुग्ण जास्त असून यावर आराेग्य विभागाकडून उपाययाेजना करण्यात येत आहेत.

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार असून तो प्लास्मोडिअम नावाच्या परजिवींमुळे होताे. डास हे रोगवाहक म्हणून कार्य करतात. मादी डास चावल्याने या परजिवीचा प्रसार होतो आणि ताप, डोकेदुखी आणि उलटीसारख्या फ्लूसदृश लक्षणांमुळे मलेरिया झाल्याचे डाॅक्टरांच्या निदर्शनास येताच या आजारावर याेग्य ताे उपचार करण्यात येताे. प्लास्मोडियम परजिवीमुळे मलेरिआ हाेत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. मलेरियाचे कारण असलेल्या इतर चार प्रकारांपैकी प्लाझोमोडियम फाल्सीपेरम हे दरवर्षी सुमारे ९ टक्के मलेरिया रुग्णांच्या मृत्यूंना जबाबदार असल्याची माहिती आराेग्य विभागाकडून देण्यात आली.
 
मलेरियाची लक्षणे 
- कणकणीसह थंडी वाजणे.
- अतिप्रमाणात ताप, डोकेदुखी आणि उलटी होणे.
- कधीकधी तरुण रुग्णांना आकड्या येऊ शकतात.
- घाम आल्यानंतर ताप जातो. थकवा व गळून गेल्याची जाणीव होते.
- पाठ वर करून स्थितीत झोपण्याची इच्छा.
- खोल श्वास आणि श्वास घेण्यात अडचण.
- रक्तक्षयाची लक्षणे. थकल्यासारख्या आणि सामान्य अशक्तपणा जाणवणे.
 
मलेरियावर उपाययाेजना
मलेरिय या आजारावर उपचार करताना आजाराची तीव्रता बघून उपाय करण्यात येतात. यामध्ये क्लाेराेक्वीन, प्रायमाक्वीन यांसारखी मलेरियाला प्रतिबंध घालणारी औषधे देण्यात येतात. रुग्ण अधिक गंभीर असल्यास ताेंडावाटे औषध न देता सलाइन व इंजेक्शनद्वारे औषधाेपचार करून उपाययाेजना करण्यात येतात.
 
मलेरियाचे रुग्ण डासांमुळे वाढले असले तरी त्यावर तातडीने उपाययाेजना करणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छता, कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून काेणताही साथीचा आजार किंवा मलेरिया, डायरिया यांसारखे आजार हाेणार नाहीत. आराेग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययाेजना करून काळजी घेण्यात येत आहे.
-  डाॅ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक, अकाेला
 

Web Title: During the rainy season, mosquito breeding, malaria cases increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला