६0 हजार डब्यांमध्ये रेल्वे ठेवणार ‘डस्ट बीन’
By admin | Published: October 17, 2015 01:58 AM2015-10-17T01:58:02+5:302015-10-17T01:58:02+5:30
प्रवासी गाड्यांच्या स्वच्छतेवर रेल्वेचा भर.
राम देशपांडे / अकोला : भारतीय रेल्वे प्रशासन प्रवासी गाड्यांच्या स्वच्छतेवर भर देणार असून, त्याचाच एक भाग म्हणून प्रवासी गाड्यांच्या ६0 हजार वातानुकूलित आणि स्लीपर कोचमध्ये प्रवाशांना कचरा टाकण्याकरिता लवकरच ह्यडस्ट बीनह्ण ठेवण्यात येणार आहेत. कोच निर्माण कारखान्यातील अभियंत्यांसोबत बुधवारी दिल्ली येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धावत्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून फेकल्या जाणार्या कचर्यामुळे रेल्वे प्रशासन कमालीचे त्रस्त झाले असून, वातानुकूलित डब्यांमध्ये ही समस्या जास्तच त्रासदायी असते. त्यामुळे सर्व एक्सप्रेस गाड्यांच्या ६0 हजार डब्यांमध्ये ह्यडस्ट बीनह्ण (कचराकुंड्या) ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी वातानुकूलित आणि स्लीपर क्लास डब्यांना प्राधान्य दिले जाणार असून, रेल्वेच्या सफाई कर्मचार्यांना उचलणे सहज शक्य होईल या दृष्टिकोनातून डब्यांच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ त्या ठेवल्या जाणार आहेत. रेल्वेला लागणार्या सर्व वातानुकूलित डब्यांची निर्मिती ही चेन्नई येथील कारखान्यात केली जाते. त्याच ठिकाणी या ह्यडस्ट बीनह्णदेखील तयार केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे दर दिवशी २.५ कोटी प्रवाशांची ने-आण करते. त्यापैकी वातानुकूलित व स्लीपर क्लास डब्यांमध्ये प्रवासी साधारणत: १६ तास प्रवास करतात. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून डब्यांची अंतर्गत रचना तथा सुविधांवर भर दिला जात आहे.