वाडेगाव-अकोला मार्गावर धूळ; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:36 AM2021-02-28T04:36:30+5:302021-02-28T04:36:30+5:30
गत तीन वर्षांपासून वाडेगाव-माझोड-अकोला या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, ...
गत तीन वर्षांपासून वाडेगाव-माझोड-अकोला या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, खड्डेच खड्डे पडले आहेत. वाडेगाव परिसरातील नागरिकांना अकोला जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने या मार्गाने नेहमी गर्दी असते. धुळीमुळे रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे, तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात रब्बी पिके बहरली आहेत. रस्त्यावरील धूळ पिकांवर साचत असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
--------------------
वाडेगाव-अकोला मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागते, तसेच धुळीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे.
-दिपक मसने, भाजप वाडेगाव.
-------------------
रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
- चंद्रशेखर चिंचोळकर, जि.पं. सदस्य वाडेगाव