दिंडी मार्गावर टाकला मातीमिश्रित मुरूम ; लाेकप्रतिनिधींचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:48+5:302021-08-21T04:23:48+5:30
शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गासाठी २०१६ मध्ये निधीची तरतूद करण्यात आली हाेती. २०१७ मध्ये शेगाव पासून या मार्गाच्या निर्माण ...
शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गासाठी २०१६ मध्ये निधीची तरतूद करण्यात आली हाेती. २०१७ मध्ये शेगाव पासून या मार्गाच्या निर्माण कार्याला सुरुवात करण्यात आली. चार वर्षांपासून दिंडी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरु असून रस्ता रुंदीकरणासाठी खाेदकाम करण्यात आल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. पावसाळ्यात अर्धवट दुरुस्ती केलेला रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरु लागला आहे. यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अकाेला पूर्व विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या गाेरगाव ते माझाेड रस्त्याच्या कडेला मातीमिश्रित मुरुम टाकण्यात आल्याने त्यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. या कामाची भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी पाहणी केली असता, कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना समाेर आला. यावेळी त्यांच्यासाेबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण सरनाईक, भाजपचे उपाध्यक्ष डाॅ. शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, राजेश ताले, डॉ. गजानन मानकर, विजय
ढोरे, राजू पाटील ढोरे, नरेश वाकोडे, पुरुषोत्तम गावंडे, गजानन वाकोडे, शिवा
वाकोडे, दुष्यंत शेगावकर, पंजाब भागवत, बाळू भागवत, गौरव सोनटक्के आदी उपस्थित होते.
या मार्गावर जीविताला धाेका
शेगाव ते पारस, निमकर्दा, गायगाव, भाैरद तसेच वाशिम बायपास मार्गावरील हिंगणा ते कळंबेश्वर, गाेरेगाव, माझाेड, भरतपूर ते वाडेगाव पर्यंतच्या मार्गावरून प्रवास करणे जिल्हावासीयांसाठी धाेकादायक ठरु लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड राेष पसरल्याचे चित्र आहे.