ऑटोचालकांची दादागिरी, पोलिसांवर भारी!

By admin | Published: October 1, 2015 02:24 AM2015-10-01T02:24:27+5:302015-10-01T02:24:27+5:30

ऑटोरिक्षांच्या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे अकोला शहरातील रस्ते झाले अरुंद .

Duty of automobiles, heavy police! | ऑटोचालकांची दादागिरी, पोलिसांवर भारी!

ऑटोचालकांची दादागिरी, पोलिसांवर भारी!

Next

अकोला: शहरात ऑटोरिक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ऑटोरिक्षांमुळे शहरातील प्रत्येक रस्ता व्यापला गेला आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गांधी चौक, कोतवाली चौकांमध्ये तर ऑटोरिक्षा चालकांची मक्तेदारीच निर्माण झाली असून, प्रमुख मार्गांवर ऑटोरिक्षा चालकांचे वाढते अतिक्रमण अपघातांना आमंत्रण देत आहे. ऑटोरिक्षा चालकांनी थेट रस्त्यांवरच अतिक्रमण केल्यामुळे रुंद रस्ते अरुंद झाले असल्याने वाहन काढण्यास जागाच नसल्याने वाहनचालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. यावरून शहरातील रस्त्यांवर ऑटोरिक्षा चालकांची वाढती दादागिरी, पोलिसांवर भारी पडत आहे. मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास टॉवर चौकातून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या एका दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडत नेल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात महिलेच्या देहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. महिलेच्या वाहनाला रस्त्याच्या बाजूला जाण्यासाठी थोडीतरी जागा मिळाली असती तर अपघात टळला असता. परंतु बसस्थानकासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ऑटोरिक्षा चालक आणि किरकोळ व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते लहान झाले असून, वाहने पुढे काढायला थोडीही जागा मिळत नसल्याने, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ऑटोरिक्षा चालकांना ऑटोस्टँडसाठी जागा देण्यात आली असताना, ऑटोरिक्षा स्टँडवर उभे न करता, रस्त्यांवर उभे केले जातात. ऑटोरिक्षा चालकांची दादागिरी वाढत असून, पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली आहे. रस्त्यांवर ऑटोरिक्षा उभे केल्याचे सर्रास चित्र, बसस्थानक समोरील दोन्ही प्रवेशद्वार, हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकाकडून गांधी रोडकडे जाणार्‍या कडेला ऑटोरिक्षाचालक रस्त्यांवरच ऑटो उभे करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ऑटोचालक रस्त्यांवर अतिक्रमण करीत असताना, वाहतूक पोलीस मात्र, बघ्याची भूमिका घेता. वाहतुकीचे नियंत्रण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. परंतु वाहतूक पोलीसच त्यांच्या कर्तव्यापासून दूर जात असल्याने, त्यांच्या डोळय़ांदेखत अपघाताच्या घटना घडतात. शहराच्या बेशिस्त वाहतुकीमध्ये ऑटोरिक्षा चालकांचा सर्वात मोठा वाटा आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांना ऑटोरिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारावाच लागेल.

Web Title: Duty of automobiles, heavy police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.