जिल्ह्यात ३.६६ लाख शेतकऱ्यांच्या शेतांत होणार ‘ई-पीक’ पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:29+5:302021-08-23T04:22:29+5:30

अकोला : महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यात ‘ई-पीक’ पाहणी कार्यक्रम स्वातंत्र्य दिनापासून (१५ ऑगस्ट) सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ३ ...

E-crop survey to be conducted in 3.66 lakh farmers' fields in the district! | जिल्ह्यात ३.६६ लाख शेतकऱ्यांच्या शेतांत होणार ‘ई-पीक’ पाहणी!

जिल्ह्यात ३.६६ लाख शेतकऱ्यांच्या शेतांत होणार ‘ई-पीक’ पाहणी!

Next

अकोला : महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यात ‘ई-पीक’ पाहणी कार्यक्रम स्वातंत्र्य दिनापासून (१५ ऑगस्ट) सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ‘ई-पीक’ पाहणी होणार असून, मोबाईल ॲपद्वारे शेतकरी शेतातील पिकांच्या नोंदी घेणार आहेत.

शेतातील पिकांच्या नोंदीसाठी शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘ई-पीक’ पाहणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून महसूल प्रशासनामार्फत ई-पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांकडून शेतातील पिकांची माहिती नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ लाख ६६ हजार सातबाराधारक शेतकरी असून, संबंधित शेतकरी शेतातील पिकांची नोंद ‘ई-पीक पाहणी ’ ॲपद्वारे करणार आहेत. जिल्ह्यातील सातबाराधारक सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील ‘ई-पीक’ पाहणी येत्या ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा महसूल प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले असून, त्यानुषंगाने शेतकऱ्यांकडून मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकांची नाेंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

बांधावर जाऊन पिकांचा फोटो

अपलोड करणे आवश्यक !

‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी बांधावर जाऊन मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकाच्या माहितीसह पिकांचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. एका मोबाईल ॲपद्वारे २० शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती नोंदविता येऊ शकते.

महसूल अधिकारी, कर्मचारी

३१ ऑगस्टला बांधावर !

‘एक दिवस ई पीक पाहणीचा’ या उपक्रमांतर्गत ३१ ऑगस्टला जिल्ह्यात महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी ते कोतवाल अशा विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी शेताच्या बांधावर जाऊन ‘ई पीक पाहणी’ ॲपद्वारे पिकाच्या नोंदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहेत. तसेच ‘ई-पीक’ पाहणीत पिकांच्या नोंदीसाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) जी.डब्ल्यू. सुरंजे यांनी सांगितले.

१२३० शेतकऱ्यांनी केली पिकांची नोंद!

‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमांतर्गत २१ ऑगस्ट जिल्ह्यातील १ हजार २३० शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद केली आहे. ‘ई पीक’ मोबाईल ॲपद्वारे जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नोंद करण्याचे काम येत्या ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महसूल प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे.

पीक पाहणीची अशी आहे उपयुक्तता!

‘ई-पीक ‘पाहणीमुळे पिकांची सद्य:स्थिती आणि आकडेवारी एकत्रितरीत्या उपलब्ध होणार असून, पीकनिहाय उत्पादनाचा अचूक अंदाज, नैसर्गिक आपत्तीवेळी देण्यात येणारी मदत, नुकसानभरपाई तसेच विविध योजनांतर्गत अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची माहिती उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: E-crop survey to be conducted in 3.66 lakh farmers' fields in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.