आरोग्य विभागात चालणार ‘ई-ऑफिस’ कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:55 AM2020-03-03T10:55:41+5:302020-03-03T10:55:52+5:30

प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मार्च अखेरपर्यंत आरोग्य विभागात नियमित होणार आहे.

E-office to run in health department! | आरोग्य विभागात चालणार ‘ई-ऑफिस’ कारभार!

आरोग्य विभागात चालणार ‘ई-ऑफिस’ कारभार!

Next

- प्रवीण खेते 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सी. डॅक पोर्टलच्या माध्यमातून आरोग्य विभागात ‘ई-ऑफिस’ची संकल्पना सोमवारपासून प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजाच्या प्रत्येक दस्तऐवजाची नोंद आता त्याच दिवशी ऑनलाइन होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मार्च अखेरपर्यंत आरोग्य विभागात नियमित होणार आहे.
कामकाजांना गती मिळावी, तसेच प्रत्येक कामाची केंद्रीकृत नोंद व्हावी या उद्देशाने ‘ई-ऑफिस’ ही संकल्पना आरोग्य विभागात प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही या उपक्रमाला आरोग्य विभागातून सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोमवार २ मार्च रोजी राज्यभरात जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर लगेच या कार्यपद्धतीमध्ये कामकाजात सुरुवात करण्यात आली. त्यामुळे रुग्णांच्या नोंदीसह आरोग्य विभागातील इतर महत्त्वाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा ‘ई-आॅफिस’वर आॅनलाइन नोंदविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाºयाला ‘राष्ट्रीय माहिती विज्ञान कार्यालया’द्वारे युझरनेम व पासवर्ड दिला जाणार असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागात हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मार्च अखेरीस प्रत्येक कामकाजाची ऑनलाइन नोंद नियमित करण्यात येणार आहे.


ज्या दिवसाचे काम त्याच दिवशी होणार

दररोजच्या कामकाजाची आॅनलाइन नोंद त्याच दिवशी करावी लागणार असल्याने ज्या दिवशीचे काम त्याच दिवशी होणार आहे. त्यामुुळे आरोग्य विभागाच्या कार्यालयीन कामकाजाला गती मिळणार आहे. शिवाय प्रलंबित कामांचे प्रमाण कमी होणार आहे.


टपाल पद्धत होईल बंद!
महत्त्वाचे दस्तऐवज एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात पाठविण्यासाठी आरोग्य विभागात टपाल पद्धतीची महत्त्वाची भूमिका आहे; परंतु ‘ई-आॅफिस’मुळे आता टपाल पद्धती बंद होणार असल्याचीही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.


‘ई-आॅफिस’च्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या प्रत्येक कामकाजाची आॅनलाइन नोंद होणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी राज्यभरात एकाच वेळी जिल्हास्तरावर आरोग्य विभागातील कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. मार्च अखेरीस संपूर्ण कारभार हा ‘ई-आॅफिस’च्या माध्यमातूनच चालणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: E-office to run in health department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला