१२-१३ ऑगस्टला पूर्व क्षितीजावर प्रकाश उत्सव; दोन दिवस उल्का वर्षाव; नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार

By Atul.jaiswal | Published: August 9, 2023 12:08 PM2023-08-09T12:08:56+5:302023-08-09T12:10:03+5:30

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी पूर्व क्षितीजावर उल्का वर्षाव होणार असून, अवकाश प्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे.

Eastern Horizon Festival of Lights on August 12-13; Two days of meteor showers; Can be seen only with eyes | १२-१३ ऑगस्टला पूर्व क्षितीजावर प्रकाश उत्सव; दोन दिवस उल्का वर्षाव; नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

अकोला : अत्यंत गुढ रम्य असलेल्या अवकाशात विविध खगोलीय घटना घडत राहतात. अशीच एक नयनरम्य घटना १२ व १३ ऑगस्टला घडणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी पूर्व क्षितीजावर उल्का वर्षाव होणार असून, अवकाश प्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे.

आकाशात अचानक एखादी प्रकाशरेखा क्षणार्धात उमटावी, आपण तीला तारा तुटला असे म्हणतो, वास्तविक पाहता ताऱ्याचा आणि या प्रकाश रेषेचा काही एक संबंध नसतो तर ती एक उल्का असते.अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू, लघुग्रह, आदींचे तुकडे जेव्हा पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात अशा उल्का अधून मधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात. उल्कांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा निश्चित असल्यामुळे वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समूहातून काही उल्का अधिक प्रमाणात पडताना दिसतात.

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी आकाशात विविधरंगी रोषणाईच्या स्वरुपात स्विफ्ट टटल या धूमकेतूंच्या अवशेषातून बघता येईल. १२ व १३ ऑगस्टला हा विविधरंगी प्रकाश उत्सव मध्यरात्री नंतर पूर्व क्षितिजावर ययाती या तारका समूहातून आरंभ होईल. याचवेळी गुरु ग्रह आकाश मध्याशी सोबतीला असेल.असा पूर्वेचा अपूर्व नजारा सहज बघता येईल. पावसाळ्यातील अशी ही अपूर्व दिवाळी आकाश प्रेमींनी अनुभवावी, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

ताशी ६० ते १०० उल्कांचे दर्शन
यावेळी सर्वसाधारण दर ताशी ६० ते १०० या प्रमाणात उल्का तुटताना दिसतील. जसजशी रात्र संपायला लागेल तसतसा उल्का वर्षावाचा वेग वाढता असेल. हा नयनरम्य नजारा अंधाऱ्या भागातुन झोपलेल्या स्थितीत ययातीकडे नजर ठेवून नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.
 

Web Title: Eastern Horizon Festival of Lights on August 12-13; Two days of meteor showers; Can be seen only with eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला