नरनाळा महोत्सवाला लागले ग्रहण

By admin | Published: December 18, 2014 01:02 AM2014-12-18T01:02:39+5:302014-12-18T01:02:39+5:30

सलग तिस-या वर्षीही नरनाळा महोत्सव रद्द.

The eclipse took place at the Narnala Festival | नरनाळा महोत्सवाला लागले ग्रहण

नरनाळा महोत्सवाला लागले ग्रहण

Next

अकोला : अकोला जिल्ह्याचा सन्मान बनलेला नरनाळा महोत्सव सलग तिसर्‍या वर्षीही होण्याची चिन्हे नाहीत. मागील दोन वर्षांपासून नरनाळा महोत्सवाला जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही.
अकोला जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी नरनाळा महोत्सव हा महत्त्वाचा दुवा बनला होता. २00७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकारातून नरनाळा महोत्सवाची मुहरूतमेढ रोवल्या गेली. अकोला जिल्ह्याचे वैभव असलेला नरनाळा किल्ला पाहताना परदेशी यांच्या मनात हा किल्ला पर्यटकांच्या नजरेपासून दूर असल्याचे लक्षात आले. पश्‍चिम महाराष्ट्रातील किल्लय़ांपेक्षा नरनाळा किल्लय़ाचे वैशिष्ट्ये खूपच वेगळे असल्याचे त्यांना दिसून आले. हा किल्ला पर्यटनाच्या नकाशावर आला पाहिजे, असे त्यांच्या मनात आले आणि नरनाळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेरुळ आणि एलिफंटा महोत्सवाच्या धर्तीवर नरनाळा महोत्सव सुरू करण्याचे मनात ठाणले आणि नरनाळा महोत्सवाचा जन्म झाला.
जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी व जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधव यांच्या सहकार्यातून पहिल्याच वर्षी नरनाळा महोत्सव अतिशय यशस्वी झाला. या महोत्सवामुळे नरनाळ्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला. परदेशी यांच्यानंतर मथ्थुकृष्णन यांनीदेखील नरनाळा महोत्सव आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यकाळात सलग तीन वर्ष नरनाळा महोत्सव झाला. त्या नंतरचे जिल्हाधिकारी परिमलसिंग यांनीदेखील नरनाळा महोत्सवाच्या आयोजनात रुची दाखविली आणि २0१२ मध्ये सलग सहाव्या वर्षी नरनाळा महोत्सव आयोजित केला गेला; परंतु २0१३ पासून नरनाळा महोत्सवाला ग्रहण लागले. यावर्षीदेखील नरनाळा महोत्सव होऊ शकला नाही.
आता येणार्‍या वर्षातही होण्याची काही शक्यता नाही. अकोल्याचे ऐतिहासिक वैभव उजेडात आणणारा व आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा नरनाळा महोत्सव बंद झाल्यामुळे एक चांगली परंपरा खंडित झाली आहे.

Web Title: The eclipse took place at the Narnala Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.