छत्रपती उद्यानमध्ये ईको फ्रेंडली गणेश घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:02 IST2019-09-11T15:02:45+5:302019-09-11T15:02:52+5:30
उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ईको फ्रेंडली गणेश घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

छत्रपती उद्यानमध्ये ईको फ्रेंडली गणेश घाट
अकोला : स्थायी समिती सभापती विनोद मापारी मित्र परिवार यांच्यावतीने १२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनकरिता ईको फ्रेंडली गणेश घाटाची निर्मिती प्रभाग क्र. २० मधील छत्रपती उद्यान, रिंग रोड, कौलखेड येथे करण्यात आलेली आहे.
परिसरातील घरगुती गणरायांच्या मूर्तींचे भावपूर्ण व कौटुंबिक वातावरण या ठिकाणी असते. आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्याकरिता नागरिकांनासुद्धा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ईको फ्रेंडली गणेश घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शहरातील नागरिकांनी ईको फ्रेंडली गणेश घाटावर आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने यावे, असे आवाहन विनोद मापारी मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात येईल. त्यामध्ये पालखी, सनई चौगडा तसेच शाडू मातीचे गणपतीचे महत्त्व प्लॅस्टर आॅफ पॅरिस गणपतीपासून पर्यावरणास होणारा धोका याबाबतचे महत्त्व समजून घेण्याबाबतचे फलक लावण्यात आलेले आहेत.