खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:34+5:302021-09-26T04:21:34+5:30

मागील वर्षी दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले. भाजीला ...

Edible oil cheaper by Rs 15; Now eat the spoonful! | खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त!

खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त; आता चमचमीत खा मस्त!

googlenewsNext

मागील वर्षी दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले. भाजीला फोडणी कशी द्यायची, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबापुढे होता. आता तेल स्वस्त झाले, इतर वस्तूंचे भाव कमी होतील का? असा प्रश्न सामान्य कुटुंबातील गृहिणी विचारत आहेत.

तेलाचे दर (प्रति लिटर)

ऑगस्ट सप्टेंबर

सोयाबीन १६० १४५

सूर्यफूल १६० १५०

करडी २३० २२५

पामतेल १४३ १३०

शेंगदाणा १८० १७०

मोहरी २१० २३०

तीळ २३० २४०

म्हणून दर झाले कमी

मागील आठवड्यात केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने बाजारात तेलाच्या दरात लिटरमागे १० ते १५ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तरी पुढील सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढणार आहे.

- भरत अग्रवाल, व्यापारी

किराणा खर्चात बचत

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. पेट्रोल, गॅससह तेलाच्या किमतीही वाढल्या होत्या. आता गत पाच दिवसांपासून काही प्रमाणात तेल स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला.

- किरण इंगळे, गृहिणी

बऱ्याच दिवसांनंतर थोड्याफार प्रमाणात तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे किराणा खर्चात बचत झाली असून, दिलासाही मिळाला आहे; परंतु पुढील सणासुदीच्या काळात दर आणखी कमी झाल्यास फायदा होईल.

- रक्षा जैन, गृहिणी

Web Title: Edible oil cheaper by Rs 15; Now eat the spoonful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.