शिक्षण सभापतींचा कारभार अध्यक्षांच्या दालनातून!
By admin | Published: August 30, 2016 02:06 AM2016-08-30T02:06:51+5:302016-08-30T02:06:51+5:30
अकोला जिल्हा परिषदेत शिक्षण सभापतींचा कक्ष कृषी सभापतींनी घेतला.
अकोला, दि. २९: जिल्हा परिषदेत शिक्षण सभापतींचे असलेले कक्ष कृषी सभापतींनी घेतल्याने, कृषी व पशुसंवर्धन सभापती पुंडलीकराव अरबट जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनातील ह्यअँन्टी चेंबरह्णमधूनच कारभार सांभाळीत आहेत. त्यामुळे शिक्षण सभापतींच्या कक्षाचा गुंता केव्हा सुटणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या खातेवाटपात कृषी व पशुसंवर्धन सभापती पद माधुरी गावंडे यांच्याकडे तर शिक्षण व अर्थ सभापती पद पुंडलीकराव अरबट यांच्याकडे देण्यात आले. जिल्हा परिषदेत यापूर्वी शिक्षण सभापतींचे असलेले कक्ष कृषी सभापती माधुरी गावंडे यांनी ताब्यात घेतले. या कक्षात बसून कृषी सभापतींनी कारभारही सुरू केला. त्यामुळे यापूर्वी कृषी सभापतींचे असलेले कक्ष शिक्षण सभापती अरबट यांच्या वाट्यावर आले. कक्ष अदालबदलीच्या या वादात सभापती झाल्यापासून शिक्षण सभापती आपल्या कक्षात बसले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या दालनातील ह्यअँन्टी चेंबरह्णमध्ये बसूनच शिक्षण सभापती आपला कारभार चालवित आहेत.