कान्हेरी सरप केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:20 AM2021-07-29T04:20:09+5:302021-07-29T04:20:09+5:30

शिक्षण परिषदेचे मुख्य मार्गदर्शक गटशिक्षण अधिकारी रतणसिंग पवार, तर सुलभक संतोष देशमुख यांनी सेतू अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी, गरज आणि उद्दिष्टे ...

Education Council of Kanheri Sarap Kendra held | कान्हेरी सरप केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

कान्हेरी सरप केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

Next

शिक्षण परिषदेचे मुख्य मार्गदर्शक गटशिक्षण अधिकारी रतणसिंग पवार, तर सुलभक संतोष देशमुख यांनी सेतू अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी, गरज आणि उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर धरमसिंग राठोड, महादेव राऊत यांच्यासह मनोज जयस्वाल, संतोष देशमुख यांनी विषयनिहाय सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा घडवून माहिती दिली. ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासक्रमाच्या नोंदी कशा पद्धतीने करण्यात याव्यात, मूल्यमापन चाचणी रेकॉर्ड नोंदी कशा पद्धतीने ठेवण्यात याव्यात, याबाबत केंदप्रमुख मनोज जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. साधन व्यक्ती वैशाली शेटे यांनी सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप विशद केले. संचालन व प्रास्ताविक केंद्रप्रमुख मनोज जयस्वाल, परिषदेला गजानन ठाकरे यांनी तांत्रिक साहाय्य दिले, तर गणेश महल्ले यांनी आभार मानले.

Web Title: Education Council of Kanheri Sarap Kendra held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.