शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:48 PM2018-09-25T12:48:24+5:302018-09-25T12:50:56+5:30

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत.

Education department again winds up; Incharge Education Officer on Leave | शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर 

शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर 

googlenewsNext

 




अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभाग पुन्हा एकदा वाºयावर आहे.
शिक्षण समितीच्या १३ जुलै रोजी झालेल्या सभेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याबाबत चुकीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये अनियमितता करण्यात आली. त्यामुळे कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला. सेवाज्येष्ठतेनुसार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संध्या कांगटे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्याकडे प्रभार देणे आवश्यक होते; मात्र प्रभार माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याकडे देण्यात आला. तो काढून घ्यावा, चुकीचा प्रस्ताव सादर करणाºयांवर कारवाई करावी, असा ठराव १३ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत सदस्य संतोष वाकोडे यांना मांडला. ज्योत्स्ना चोरे यांनी अनुमोदन दिले. त्या ठरावानुसार कार्यवाही करावी, असे पत्र शिक्षण सभापती पुंडलिक अरबट यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले. त्यानुसार अवचार यांना कार्यमुक्त करत संध्या कांगटे यांना प्रभार देण्यात आला. त्यांनी दोन ते तीन दिवस काम पाहिल्यानंतर लगेच दीर्घ रजेवर गेल्या. त्यामुळे पदवीधर शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची मुदतही प्रशासनाला पाळता आली नाही. सेवाज्येष्ठता यादी अंतिम करणाºया समितीच्या अध्यक्षपदी कांगटे यांना जबाबदारी देण्यात आली होती. ती यादीही रखडली आहे. त्यातच शिक्षण विभागातील दैनंदिन कामकाजही प्रभावित झाले आहे. शिक्षण विभाग पुन्हा एकदा वाºयावर सोडण्यात आला आहे.

 

Web Title: Education department again winds up; Incharge Education Officer on Leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.