शिक्षण हेच भावी पिढीसाठी नवसंजीवनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:20+5:302021-08-01T04:18:20+5:30
बोरगाव मंजू: मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे शिक्षणातून भावी यशस्वी जीवन घडविण्यासाठी गाव तेथे अभ्यासिका उभारणी केल्यास समाजाचे हित ...
बोरगाव मंजू: मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे शिक्षणातून भावी यशस्वी जीवन घडविण्यासाठी गाव तेथे अभ्यासिका उभारणी केल्यास समाजाचे हित जोपासले जाईल, तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षा तयारीसह त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी समाजाने पुढे यावे. शिक्षणातच ताकद आहे, शिक्षणातून उच्च पदांसह व्यवसाय, विकास साधावा तसेच अध्यात्मामध्ये प्रेम आणि त्याग एक दुसऱ्यांचे बंधुत्व प्रेम जोपासावे, सर्वांचे कल्याण साधावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. ते स्थानिक बोरगाव मंजू येथील नियोजित विपश्यना केंद्र धम्म कुटी व मंजू शहा बाबा संस्थानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
येथील नियोजित विपश्यना केंद्र धम्म कुटीसह मंजू शहा बाबा दर्गा परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी संजय खडसे हे होते, तर प्रमुख उपस्थितीत तहसीलदार राहुल तायडे, जिल्हा परिषद सदस्या नीता संदीप गवई, सचिव संदीप गवई, सरपंच सुनील खेळकर, मंजू शहा बाबा संस्थानचे संचालक हाजी आनिस शेख, सामाजिक कार्यकर्ते सनाउल्लाह शहा, अताउर रहेमान, मौली जहीर साहब, महेबुब शहा, मोहसीन शहा, सिद्धांर्थ पाटील, ग्रामपंचायत सदस्य समिउल्ला शहा, गुरुप्रसाद तायडे, संतोष वानखडे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.