बालकुमार साहित्य संमेलन स्थळी येणार शैक्षणिक सहली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 07:55 PM2017-11-26T19:55:38+5:302017-11-26T19:57:21+5:30
बाल साहित्य नगरीत विद्यार्थ्यांना साहित्यानुभव घेता यावा म्हणून अनेक शाळांनी एक दिवसीय सहलीचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. शाळांचे शिक्षक व विद्यार्थी आपली शैक्षणिक व साहित्य सहली या निमित्ताने आयोजित करुन संमेलनात सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भ साहित्य संघाचे, अकोला शाखा आयोजित 5 वे बालकुमार साहित्य संमेलन, 1 व 2 डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे संपन्न होत आहे. बाल साहि त्य नगरीत विद्यार्थ्यांना साहित्यानुभव घेता यावा म्हणून अनेक शाळांनी एक दिवसीय सहलीचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. विदर्भाच्या 10 ही जिलतील शाळांचे शिक्षक व विद्यार्थी आपली शैक्षणिक व साहित्य सहली या निमित्ताने आयोजित करुन संमेलनात सहभागी होणार आहेत.
अकोल्यात पहिल्यांदाच होणार्या बालकुमारांसाठीच्या साहित्य संमेलनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होण्याबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आवाहन केले. या साहित्य संमेलनानिमित्त भाषा संवर्धनासाठी आयोजित भाषानिहाय दालनातील उपक्रम, चित्रकाव्य, नाट्यछटा आदि विविध उ पक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना या व्दि-दिवसीय संमेलन स् थळाला भेट देऊन साहित्यानुभव घेण्याचे आवाहन केले आहे.