नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:08 PM2018-11-09T14:08:36+5:302018-11-09T14:09:23+5:30
अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली.
अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली. लोकांनी ाास सहन करीत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या मेहनतीचा पैसा बँका, पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्समधून बदलून घेतला. नोटबंदीनंतर उद्भवलेली स्थिती ५० दिवसांनंतर आटोक्यात येईल, असे सरकारने म्हटले होते. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्ष झाले; पण अजूनही त्याची झळ अकोल्यात कायम आहे. नोटाबंदीमुळे अकोल्यातील अनेक उद्योजकांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला. यातून काही सावरले; मात्र काही व्यापारी-उद्योजक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही.
नोटाबंदीनंतर समाजात आणि लोकांच्या मानसिकतेत बदल होईल, ही अपेक्षा सरकारला होती; मात्र तसे झाले नाही. अनेकांनी टीका केली. काहींनी तर नोटाबंदीला काही विशिष्ट लोकांचा अजेंटा म्हटले. हे सर्व होत असले तरी सर्वसामान्य जनता आणि आणि व्यापारी उद्योजकांना या नोटाबंदीने काय दिले, हे जाणून घेतले आहे लोकमतने काही क्षेत्रातील गणमान्य व्यापाऱ्यांकडून.
नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या व्यवहारावर प्रतिबंध लागले आहे. त्यामुळे प्रापर्टीत होणारी मोठी उलाढाल थांबली आहे. जंगम मालमत्ता घेताना होणारा व्यवहार आधी दिसत नव्हता; मात्र नोटाबंदीनंतर आणि जीएसटी लावल्याने अनेक व्यवहार दाखविणे क्रमप्राप्त झाले आहे. सोन्याची खरेदीही पूर्वीप्रमाणे कुणी करीत नाही. त्यामुळे नोटाबंदीची झळ ही कायम राहणार आहेच. कारण सर्व बदलत आहे, वेळ लागेल.
- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.
/>
- नोटाबंदी ज्या उद्देशाने सुरू झाली होती, ते उद्देश आता मागे पडले आहे. पूर्वी ५ टक्के लोक पेट्रोल पंपावरून आॅनलाइन व्यवहार करायचे. नोटाबंदीनंतर सहा महिने पॉज मशीनने आर्थिक व्यवहार केले. त्यामुळे ही टक्केवारी ४० टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र दोन वर्षांनंतर जर मागोवा घेतला तर आता केवळ २० टक्के लोक स्वाइप कार्ड वापरतात. याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे.
- राहुल राठी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असो. अकोला.
- लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. नोटाबंदीचा फायदा काय झाला हा विषय संशोधनाचा आहे; मात्र लोक आता आॅनलाइन व्यवहार करू लागले आहे. पूर्वीप्रमाणे कॅशचे व्यवहार लोक सहज करीत नाही. शासनाचा धाक निर्माण झाला आहे.
- कमल आलिमचंदानी, उद्योजक, अकोला.