अणुतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर काळाची गरज - एस. पी. काळे

By admin | Published: March 20, 2015 12:38 AM2015-03-20T00:38:12+5:302015-03-20T01:13:13+5:30

अकोला येथे ‘पारंपरिक आणि जैवतंत्रज्ञान पद्धतीने पिकांचा विकास’ परिसंवादाचे उद्घाटन.

Effective use of Atomic power is the need of the hour - S. P. Black | अणुतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर काळाची गरज - एस. पी. काळे

अणुतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर काळाची गरज - एस. पी. काळे

Next

अकोला : अणुतंत्रज्ञान व त्याचे शास्त्र याविषयी समाजात प्रचंड नकारात्मकता आहे; पण खर्‍या अर्थाने कृषी आणि तत्सम शास्त्राच्या विकासाकरिता अणुतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. पी. काळे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ह्यपारंपरिक आणि जैवतंत्रज्ञान पद्धतीने पिकांचा विकासह्ण या विषयावर आयोजित १६ व्या वसंतराव नाईक स्मृती राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन १९ मार्च रोजी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काळे यांनी मार्गदर्शन केले. भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे धावत आहे. तो सुख-शांती विसरला आहे. मनुष्यामध्ये नकारात्मकतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सुख-शांती हवी असेल, तर ही नकारात्मकता सोडून सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल, असे भावनिक आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. दोन दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. याप्रसंगी अमेरिकेच्या टेक्सास तंत्र विद्यापीठाचे सहयोगी संचालक डॉ. डेव्हिड सी. वीनडॉर्फ, आयसीएआरचे (बियाणे) माजी साहाय्यक संचालक डॉ. एन. डी. जांभळे, एमपीकृविच्या डॉ. विद्या गुप्ता, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. दाणी म्हणाले, जैवतंत्रज्ञानात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने आाघाडी घेतली आहे. भविष्यातील या तंत्रज्ञानाची गरज ओळखून विद्यापीठाने जैवतंत्रज्ञान विषयामध्ये अभ्यासक्रम आणि अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे तंत्रज्ञान व कृषी निविष्ठा सहजपणे उपलब्ध करू न देण्यासाठी कृषी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Effective use of Atomic power is the need of the hour - S. P. Black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.