सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्यावसायिक शेतीसाठी फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:18+5:302021-07-14T04:22:18+5:30
कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यंदाच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथे आयोजित शेतकरी बांधवांशी संवाद तथा ...
कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यंदाच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथे आयोजित शेतकरी बांधवांशी संवाद तथा प्रक्षेत्र भेट कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी उत्पादक कंपनीसह विविध विभागांद्वारे बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात उद्योगाची स्थापना करीत शाश्वत ग्रामोद्धार साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. विलास खर्चे यांनी मार्गदर्शनप्रसंगी केले. ग्रामपंचायत तिवसाच्या आवारात झालेल्या या शेतकरी संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालनालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी केले, तर गावकऱ्यांच्यावतीने सुरेश लुले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर सरपंच ग्रामपंचायत, तिवसा, गजानन लुले पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके, पानी फाऊंडेशनच्या विद्या आकोडे यांच्यासह मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रमोद वाकळे यांची उपस्थिती होती. प्रा. संजीवकुमार सलामे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी विस्तार शिक्षण संचालनालयाच्या डॉ. विनोद खडसे, प्रा. सलामे, डॉ. सुहास मोरे, डॉ. नागनाथ जंगवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.