पत्रकारांच्या स्थैर्यासाठी प्रयत्नांची गरज बिडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:56 AM2021-01-08T04:56:08+5:302021-01-08T04:56:08+5:30

अकोला : पत्रकारांना काळानुरूप वाट्याला येणारा संघर्ष आणि बदलांना सामोरे जावे लागते. कोविड महामारीचा फटकाही त्यांना बसला. ...

Efforts are needed to stabilize journalists | पत्रकारांच्या स्थैर्यासाठी प्रयत्नांची गरज बिडवे

पत्रकारांच्या स्थैर्यासाठी प्रयत्नांची गरज बिडवे

Next

अकोला : पत्रकारांना काळानुरूप वाट्याला येणारा संघर्ष आणि बदलांना सामोरे जावे लागते. कोविड महामारीचा फटकाही त्यांना बसला. त्यामुळे पत्रकारांच्या स्थैर्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ. किशोर बिडवे यांनी व्यक्त केले. अकोला श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारीला विद्यापीठातील शेतकरी सदन येथे ज्येष्ठ पत्रकार माणिकराव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात डाॅ. बिडवे बोलत होते.

व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार तथा श्रमिक पत्रकार संघाचे सल्लागार महेंद्र कविश्वर हे उपस्थित हाेते. महेंद्र कविश्वर म्हणाले की, पत्रकाराकडे समाज आरसा म्हणून बघतो. त्यामुळे पत्रकारांनी सामाजिक जबाबदारी ओळखावी. केवळ नकारात्मक बातम्यांनाच स्थान न देता सकारात्मक व चांगल्या बाबींचीही दखल घेतली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. अजय डांगे यांनी माणिकराव कांबळे यांच्या संघर्षमय प्रवासाची मांडणी केली. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव आशिष गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला राजेश शेगाेकार, मनाेज भिवगडे, सचिन देशपांडे, जीवन साेनटक्के, शरद पाचपाेर, गाेपाल हागे, महेश घाेराळे, गणेश साेनाेने, ॲड. जयेश गावंडे, प्रवीण ठाकरे, प्रवीण खेते, माे. साकीब, करुना भांडारकर, हर्षदा साेनाेने, सुरेश राठाेड, बंदी नांदूरकर, राजू चिमणकर आदी उपस्थित हाेते.

--

''''चांगले गुण वेचत गेलो''''

आतापर्यंतच्या पत्रकारितेच्या वाटचालीत माझ्यापेक्षा वय आणि अनुभवाने लहान असणारे अनेकजण माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत. अनेक ज्येष्ठांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सहवासातून चांगले गुण वेचत मी येथपर्यंत पोहोचलो. या सहवासातूनच आत्मविश्वासाने हा प्रवास करता आला. या सन्मानामुळे हा प्रवास सार्थक झाल्याचे समाधान वाटते, असे मत ज्येष्ठ पत्रकार माणिकराव कांबळे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

Web Title: Efforts are needed to stabilize journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.