‘मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न गरजेचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:18 AM2021-03-19T04:18:04+5:302021-03-19T04:18:04+5:30

अकाेला : रसिकांना हसविणारे हास्यसम्राट स्व. अरविंद भाेंडे यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वात पाेकळी निर्माण झाली असून, त्यांनी नवाेदित ...

‘Efforts Needed for Prosperity of Marathi Language’ | ‘मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न गरजेचे’

‘मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न गरजेचे’

Next

अकाेला : रसिकांना हसविणारे हास्यसम्राट स्व. अरविंद भाेंडे यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वात पाेकळी निर्माण झाली असून, त्यांनी नवाेदित साहित्यिकांना घडविण्याचे काम केले. साहित्यिकांनी मतभेद विसरून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न करावेत, हा त्यांचा विचार जनमानसात रुजविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे विचार साहित्यिकांनी व्यक्त केले. अ.भा. वऱ्हाडी साहित्य मंच, अंकुर साहित्य संघ, शब्दसृष्टी साहित्य संस्था, युवाराष्ट्र संघटना, तरुणाई फाउंडेशन, संवाद साहित्य मैफल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी साहित्यिक सन्मान साेहळा पार पडला.

प्रारंभी, हास्यसम्राटफेम, अंकुर साहित्य संघाचे आधारस्तंभ स्व. अरविंद भाेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी, हास्यसम्राटफेम, अंकुर साहित्य संघाचे आधारस्तंभ स्व. अरविंद भाेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे हाेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वऱ्हाडी कवी शिवलिंग काटेकर, मार्गदर्शक सदाशिवराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील याेगदानाबद्दल सदाशिवराव शेळके यांचा, तर वऱ्हाडी शब्दकाेशनिर्मिती कार्यातील याेगदानाबद्दल डाॅ. रावसाहेब काळे, युवापिढीसाठी मार्गदर्शक चळवळीबद्दल डाॅ. नीलेश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नीलेश कवडे, नीलेश देवकर, बदरखे, राजू चिमणकर यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंमत ढाळे यांनी केले. प्रास्ताविक संताेष इंगळे यांनी केले, तर आभार संदीप देशमुख यांनी मानले.

Web Title: ‘Efforts Needed for Prosperity of Marathi Language’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.