काटेपूर्णा धरणाचे आठ वक्रद्वार उघडले; नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:06 PM2020-08-18T12:06:34+5:302020-08-18T12:10:18+5:30

आता आठ दरवाजे उघडल्या गेले असून, पूर्णा नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे.

Eight curved gates of Katepurna Dam opened; Discharge of 200.64 cusec water in river basin | काटेपूर्णा धरणाचे आठ वक्रद्वार उघडले; नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

काटेपूर्णा धरणाचे आठ वक्रद्वार उघडले; नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

googlenewsNext
ठळक मुद्देसायंकाळी साडे सहा वाजता चार दरवाजे उघडण्यात आले.९३.९२ टक्के जलसाठा झाल्यानंतर आणखी चार दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.सकाळी आठ वाजता धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले.

अकोला : गत आठवडाभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अकोला शहराची तहान भागविणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणात ९३.९२ टक्के जलसाठा झाला आहे. एकूण दहा दरवाजे असलेल्या या धरणाचे चार वक्रद्वार सोमवारी सायंकाळी उघडण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता आणखी चार द्वार उघडण्यात आले. आता आठ दरवाजे उघडल्या गेले असून, पूर्णा नदीपात्रात २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे.
महान येथील काटेपूर्णा धरणाच्या वाशिम जिल्ह्यातील जलग्रहण क्षेत्रात गत आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, बहुतांश सर्वच धरणांमध्ये मोठा जलसाठा झाला आहे. काटेपूर्णा धरणात सोमवारी ९३.९१ टक्के जलसाठा झाल्याने सायंकाळी साडे सहा वाजता चार दरवाजे उघडण्यात आले. या चार दरवाजांमधून १००.३२ घनमिटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. रात्रभर चारही दरवाजे उघडे असल्यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. मंगळवारी सकाळी धरणात ९३.९२ टक्के जलसाठा झाल्यानंतर आणखी चार दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार सकाळी आठ वाजता धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. आता एकूण आठ दरवाजे उघडे असून, यामधून २००.६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. पाऊस व धरणाची वाढती पातळी याचा अंदाज घेऊन दरवाजे उघडण्यात आली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Eight curved gates of Katepurna Dam opened; Discharge of 200.64 cusec water in river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.