आठ शेतक-यांचे ६0 लाखांच्यावर उत्पन्न बुडाले!
By admin | Published: February 25, 2016 01:36 AM2016-02-25T01:36:57+5:302016-02-25T01:36:57+5:30
वांझोटी केळी रोपे प्रकरण; कृषी विभागाचा अहवाल.
आकोट: केळीची निकृष्ट व बोगस रोपे देऊन फसवणूक झाल्याप्रकरणी कृषी विभागाने बुधवारी आठ शेतकर्यांचे उत्पन्न बुडाल्याचा अहवाल ग्रामीण पोलीस स्टेशनला सादर केला. आठ शेतकर्यांचे ६0 लाख ६३ हाजर २११ रुपयांचे उत्पन्न बुडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी कागदी घोडे नाचविणे थांबवून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्यांनी जून ते जुलै २0१५ दरम्यान केळी पिकाची लागवड केली होती. सदर रोपे त्यांनी रमेश रामचंद्र आकोटकर यांच्यासह दोघांच्या गणराज केला ग्रुप या दुकानातून घेतले होते. त्यांनी इंद्रायणी जातीचे बियाणे मिळण्यासाठी आगाऊ बुकिंग केले होते; मात्र इंद्रायणी जातीचे बुकिंग केल्याची पावती असताना दुसर्याच कंपनीची रोपे पुरविण्यात आली होती. याबाबत शेतकर्यांनी कृषी विभाग व पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, पोलिसांनी कृषी विभागाला प्रत्येक शेतकर्यांचे वैयक्तिक नुकसान किती झाले, याबाबतचा अहवाल मागितला होता. बुधवारी उपविभागीय कृषी अधिकार्यांनी पोलिसांनी आठ शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाचा अहवाल दिला.