अकोला जिल्ह्यात दिवसभरात आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:59 PM2021-04-07T18:59:11+5:302021-04-07T18:59:28+5:30

Corona Cases : ७ एप्रिल रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८६ झाला आहे.

Eight killed, 263 corona positive in Akola district | अकोला जिल्ह्यात दिवसभरात आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात दिवसभरात आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, ७ एप्रिल रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७२, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ९१, अशा एकूण २०२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २९,५५८ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,७५३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,५८१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड व मोठी उमरी येथील नऊ, पारस येथील सहा, खडकी येथील चार, खोलेश्वर, गोरक्षण रोड, शास्त्रीनगर, लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, तेल्हारा, सिंधी कॅम्प, मित्रनगर, जीएमसी, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, गांधी रोड, पैलपाडा आणि बाभूळगाव येथील प्रत्येकी दोन, उर्वरित अंदुरा, दहिगाव, ता. तेल्हारा, गाडेगाव, दापुरा, हिवरखेड, सौंदळा, अकोट, रामदास पेठ, शिवर, खरप, चौरे प्लॉट, शंकरनगर, तुकाराम चौक, कीर्तीनगर, हिंगणा फाटा, सुधीर कॉलनी, हातरुण, सस्ती, उमरी, व्हीएचबी कॉलनी, रामनगर, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, कलालची चाळ, जयहिंद चौक, दगडी पूल, देवराव बाबाची चाळ, राजंदा, तारफैल, बापू नगर, शेळद, गोकुळ कॉलनी, जठारपेठ, बोरगाव मंजू, न्यू तापडिया नगर, महसूल कॉलनी, दहातोंडा, गाडगे नगर, हिंगणा रोड, शिवसेना वसाहत, सावरगाव, देऊळगाव, पातूर, माळराजुरा, आगीखेड, चैतन्य नगर, सिंदखेड, बाळापूर, आझाद कॉलनी, राजनखेड, बार्शी टाकळी, उरळ आणि माळीपुरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी अकोट येथील १४, मुर्तिजापूर येथील नऊ, साहित येथील तीन, रणपिसेनगर, केशव नगर आणि नर्सिंग होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरीत जवाहर नगर, गितानगर, आदर्श कॉलनी, डाबकी रोड, बार्शी टाकळी, कान्हेरी सरप, मलकापूर, जांभळून, महान, जमकेश्वर, तेल्हारा, शिरसोली, मिर्जापूर, दताळा, शेरवाडी, तपे हनुमान नगर, जुने शहर, देशमुख फाईल, जीएमसी, मोठी उमरी, विझोरा, मराठा नगर, दिवेकर आखाडा, माळीपुरा, राहित, हाता, खडकी, शिरसगाव आणि अकोट फाईल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

आठ जणांचा मृत्यू

अकोला शहरातील खदान भागातील ६० वर्षीय महिला, सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय पुरुष, पारस येथील ७० वर्षीय पुरुष, अकोला जुने शहर भागातील ५४ वर्षीय पुरुष, संत तुकाराम चौकातील ७२ वर्षीय पुरुष व रणपिसे नगर येथील ६४ वर्षीय महिला, खोलेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुष व नकाशी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय महिला अशा आठ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी झाली.

 

३१९ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४२, आयकॉन हॉस्पिटल-दोन, हार्मोनि हॉस्पिटल- तीन, क्रिस्टल हॉस्पिटल-पाच, बिहाडे हॉस्पिटल-११, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर-तीन, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल-तीन, हॉटेल स्कायलार्क- दोन, समाजकल्याण वसतीगृह-१८, बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर-दोन, नवजीवन हॉस्पिटल-दोन, हॉटेल रिजेन्सी-चार, सुर्यचंद्र हॉस्पिटल-तीन, बाळापूर कोविड केअर सेंटर-दोन, ओझोन हॉस्पिटल-चार तर होम आयसोलेशन मधील २१३ अशा एकूण ३१९ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

३,७६३ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,४९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २५,३०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Eight killed, 263 corona positive in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.