माजी मंत्री बोडखेंसह आठ जणांना जामीन

By admin | Published: September 12, 2014 01:13 AM2014-09-12T01:13:34+5:302014-09-12T01:13:34+5:30

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात बोंडे यांना दर सोमवारी ‘एसीबी’कडे द्यावी लागणार हजेरी.

Eight people, including ex-minister Bodakhne, have been granted bail | माजी मंत्री बोडखेंसह आठ जणांना जामीन

माजी मंत्री बोडखेंसह आठ जणांना जामीन

Next

अकोला : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्यासह त्यांची सहा मुलं आणि भावाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने गुरूवारी मंजूर केला. ५0 हजार रु पयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना, न्यायालयाने सर्व आरोपींना दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयामध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले. यापूर्वी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ेविविध कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
माजी रोहयो राज्यमंत्री रामदास बोडखे यांनी गैरमार्गांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याची तक्रार २00७ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी चौकशी केली असता, रामदास बोडखे यांच्याकडे त्यांची मुले, माजी नगराध्यक्ष संजय, विजय, मनोज, दीपक, प्रवीण, प्रमोद आणि भाऊ देविदास बोडखे, पत्नी तसेच इतर नातेवाईकांच्या नावे अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाल्याने, बोडखेंविरुद्ध आकोट पोलिस ठाण्या त गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी रामदास बोडखे यांनी जामिनासाठी आकोट विशेष न्यायालयात धाव घेतली होती. आकोट न्यायालयातून हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे आले. गुरुवारी बोडखेंच्या जामिनावर सुनावणी झाली. न्यायालयाने ५0 हजार रूपयांचा जातमुचलका आणि प्र त्येक सोमवारी एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केल्याची माहिती एसीबीचे पोलिस उ पअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी दिली.

Web Title: Eight people, including ex-minister Bodakhne, have been granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.