शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:55 PM2019-06-22T13:55:36+5:302019-06-22T13:55:41+5:30
अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला.
अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला. यामध्ये रामदासपेठस्थित महापालिका सेमी इंग्रजी मुलांची शाळा क्र. सातमधील सात मुलांचा, तर मनपा गुजराती शाळेतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गत २० वर्षांत महानगरपालिकेच्या एकाच शाळेचे सात विद्यार्थी मेरिट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या अकराही विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत शाळेच्या नावात मानाचा तुरा खोवला. इयत्ता नववीचे नऊपैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमधून इयत्ता पाचवीचे आठ विद्यार्थी मेरिट आले. यामध्ये इयत्ता पाचवीमधून ऋषिकेश मनोज जवरे, शुभम संजय हिरे, प्रणव संजय वाघमारे, विवेक अशोक रक्षक, राधा रामभाऊ शाह, वैभव संजय वानखडे व शे. समीर शे. फारुख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.