वऱ्हाडातील आठ हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 10:56 IST2021-04-04T10:55:48+5:302021-04-04T10:56:05+5:30
Eight thousand farmers get electricity during the day: वऱ्हाडातील ८ हजार १२१ शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.

वऱ्हाडातील आठ हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज
अकोला : कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना अटल सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत प्राधान्य दिल्याने वऱ्हाडातील ८ हजार १२१ शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (१० टक्के), तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (१० टक्के), तर अनुसूचित जाती, जमाती गटांतील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरावयाची होती.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी अकोला परिमंडळांतर्गत असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यांपैकी ८ हजार १२१ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय लाभार्थी
अकोला १११३
बुलडाणा ३११०
वाशीम ३८९८