अतिक्रमण हटविण्यासाठी अकोला मनपाचा नवा प्रयोग!
By admin | Published: September 17, 2014 02:36 AM2014-09-17T02:36:57+5:302014-09-17T02:36:57+5:30
झोननिहाय कर्मचा-यांची होणार नियुक्ती
अकोला : अतिक्रमणाला चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासन गंभीर असल्याचे दिसत आहे. साडेचार लाख लोकसंख्येच्या शहरात कानाकोपर्यात अतिक्रमण वसले असून, त्यावर नियंत्रण मिळवणे एकट्या अधिकार्याच्या आवाक्यात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यानुषंगाने शहराची पाच झोनमध्ये विभागणी करून प्रत्येक झोनसाठी एका कर्मचार्याची नियुक्ती करण्याचा प्रयोग महापालिका करीत असल्याची माहिती आहे.
अतिक्रमणाची समस्या वारंवार निर्माण होण्याला संबंधित अधिकार्यांचे दुटप्पी धोरण कारणीभू त आहे. संपूर्ण शहराची जबाबदारी अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांच्याकडे असून, शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ, दिवसेंदिवस वाढते अतिक्रमण व त्याला आळा घालण्यात अतिक्रमण विभागाला आलेले अपयश ध्यानात घेता, प्रशासनाने झोननिहाय कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाच झोन तयार केल्या जातील.