वयोवृद्ध वडिलास दरमहा चार हजार रुपये निर्वाह भत्ता द्या!

By admin | Published: January 5, 2016 01:55 AM2016-01-05T01:55:58+5:302016-01-05T01:55:58+5:30

अकोला‘एसडीओं’चा चार मुलांना आदेश.

Elderly father pay maintenance allowance of four thousand rupees every month! | वयोवृद्ध वडिलास दरमहा चार हजार रुपये निर्वाह भत्ता द्या!

वयोवृद्ध वडिलास दरमहा चार हजार रुपये निर्वाह भत्ता द्या!

Next

अकोला: वयोवृद्ध वडिलाच्या उदरनिर्वाहासाठी चार मुलांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दरमहा चार हजार रुपये निर्वाह भत्ता वडिलास द्यावा, असा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शनिवारी दिला. अकोला शहरानजीकच असलेल्या खडकी बु. येथील वयोवृद्ध नागरिक ज्ञानेश्‍वर पांडुरंग ताजणे (७0) यांना सुनील ताजणे (३५), महादेव ताजणे (४0), चंदू ताजणे (२५) व मिलिंद ताजणे (२२) ही चार मुले आहेत. वडिलांनी त्यांचे पालनपोषण करून, लहानाचे मोठे केले. मोठय़ा दोन मुलांचे लग्न केले असून, दोन मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यानंतर मात्र मुलांनी वडिलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा यापासून वंचित ठेवून, मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. वडील ज्ञानेश्‍वर ताजणे हे वयोवृद्ध असून, त्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा २00७ नुसार चारही मुलांविरुद्ध उपविभागीय अधिकर्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. अन्न, वस्त्र, निवारा तसेच औषधोपचाराकरिता दरमहा दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी. आपला छळ करण्यात येवू नये, अशी मागणीही त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आली होती. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. वयोवृद्ध वडिलांच्या उदरनिर्वाहासाठी चारही मुलांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दरमहा चार हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी २ जानेवारी रोजी दिला.

Web Title: Elderly father pay maintenance allowance of four thousand rupees every month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.