अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 10:28 AM2021-05-22T10:28:21+5:302021-05-22T10:28:34+5:30

Akola News : अज्ञात वाहनचालकाविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

An elderly man was killed in an accident in akola | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

googlenewsNext

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका वृद्धाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदासपेठेतील गजानन प्लाझा येथील रहिवासी नारायण श्रीराम पाटील हे पुण्यावरून परत आल्यानंतर अकोल्यात घराच्या जवळ पायी चालत असताना त्यांना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या नारायण पाटील यांना तातडीने सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार त्यांचा मुलगा प्रमोद नारायण पाटील यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: An elderly man was killed in an accident in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.