कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 19:51 IST2022-08-01T19:51:43+5:302022-08-01T19:51:50+5:30

Elderly seriously injured in car accident : डाबकी रोड पोलिसांनी कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Elderly seriously injured in car collision | कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

अकोला : भरधाव कारचालकाने ८५ वर्षीय वृद्धास जबर धडक दिली. यात वृद्ध गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना २३ जुलै रोजी सकाळी शिवनगर येथे घडली. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवनगर येथील रहिवासी प्रमोद रामकृष्ण जसनपुरे (४०) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील रामकृष्ण चहादू जसनपुरे (८५) घरासमोर फिरत असताना बाळापूर मार्गे शिवनगरकडे येणाऱ्या एमएच ४८-ए ०५१३ क्रमांकाच्या कारच्या महिला चालकाने भरधाव कार चालवून वृद्धाला धडक दिली. त्यांच्या मांडीवर चाक केल्याने हाड मोडले आहे. यावेळी लखन ऊर्फ विवेककुमार लोटे यांनी वडिलांच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी उपचाराचा कोणताही खर्च दिला नाही. कारचालक समृद्धी विवेक लोटे हिने भरधाव कार चालवून अपघात केला. जसनपुरे यांच्या तक्रारीनुसार डाबकी रोड पोलिसांनी समृद्धी लोटे यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Elderly seriously injured in car collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.