अकोला तालुक्यात १७ सरपंच, १८ उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:15+5:302021-02-11T04:20:15+5:30
अकोला : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभांमध्ये ...
अकोला : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १० सरपंचांची आणि ९ उपसरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १० सरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, ७ सरपंचांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली. तसेच ९ उपसरपंचांची बिनविरोध तर ९ उपसरपंचांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली. त्यामध्ये दहिगाव गावंडे ग्रामपंचायत सरपंचपदी जया गावंडे, उपसरपंचपदी ममता गावंडे, यावलखेड सरपंचपदी लता दामोदर, उसरपंचपदी शारदा इंगोले, दोडकी सरपंचपदी जया चव्हाण व उपसरपंचपदी प्रभाकर कुणबीथोप, कानशिवणी सरपंचपदी सुमीत तवाळे, उपसरपंचपदी अरुण वाघमारे, सांगवी खुर्द सरपंचपदी संदीप वानखेडे व उपसरपंचपदी जयश्री वानखेडे, दहिहांडा सरपंचपदी लक्ष्मी झाडे व उपसरपंचपदी अब्दुल अजिमोद्दीन मुनीरोद्दीन, मोरगाव भाकरे सरपंचपदी उमा माळी व उपसरपंचपदी अर्चना चोपडे, उगवा सरपंचपदी गजानन बाहाकार व उपसरपंचपदी नलिनी सिरसाट, आपोती बु. सरपंचपदी वैभव तराळे व उपसरपंचपदी उज्ज्वला खोबरखेडे, कुरणखेड सरपंचपदी प्रगती पाण्डेय व उपसरपंचपदी आसीफखान गौसखान, पैलपाड सरपंचपदी वर्षा गऊड व उपसरपंचपदी गणेश मापारी, म्हैसांग सरपंचपदी मनोज देशमुख व उपसरपंचपदी नितेश गवई, बोरगावमंजू सरपंचपदी अनिता खेडकर व उपसरपंचपदी बेबिनंदा गवई, पळसो बु. सरपंचपदी लता डाबेराव व उपसरपंचपदी योगेश बढे, चांदुर सरपंचपदी वैभव माहोरे व उपसरपंचपदी अनुराधा डाबेराव, गोरेगाव खुर्द सरपंचपदी सचिन वाकोडे व उपसरपंचपदी शेख सलीम महेबूब, गोरगाव बु. सरपंचपदी जयश्री शेगावकर व उपसरपंचपदी मैना ढोरे यांची निवड करण्यात आली आहे.
--------------
खांबोरा सरपंचपद रिक्त; उपसरपंचपदी सुनंदा कड
तालुक्यातील खांबोरा ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जमाती (स्त्री) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. मात्र, या प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आला नसल्याने येथील सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले असून, उपसरपंचपदी सुनंदा कड यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली आहे.