चौकाचौकात निवडणुकीच्या गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:29+5:302020-12-27T04:14:29+5:30

तालुक्याच्या महत्त्वाच्या सर्वात माेठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. ...

Election chat at the crossroads | चौकाचौकात निवडणुकीच्या गप्पा

चौकाचौकात निवडणुकीच्या गप्पा

Next

तालुक्याच्या महत्त्वाच्या सर्वात माेठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. सत्ताधारी पदाधिकारी पुन्हा आपलेच पॅनल ग्रामपंचायतीच्या सत्तेत यावे म्हणून धडपड करीत आहेत. पॅनलच्या सर्व उमेदवारांचे नामांकन भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जुळविणे सुरू आहे. नामाकंन दाखल केल्यानंतरच पॅनलप्रमुख उमेदवारी जाहीर करतील, असे चित्र आहे. वाडेगाव, पारस येथे सत्ताधारी पॅनलचीच सत्ता आहे. तिन्ही राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांना ग्रामस्थ, मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत काय स्थान देतात, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने यांच्या देगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत येण्यासाठी धडपड सुरू आहे, तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय ताथोड हे ग्रामपंचायत निमकर्दा येथे आपले वर्चस्व राहण्यासाठी काम करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल सांबळे हे ग्रामपंचायत अंत्री मलकापूरवर आपले स्थान कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते जवळील पदाधिकाऱ्यांना सत्ता देण्यासाठी व पक्षातील असलेले वर्चस्व कायम राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका परीक्षा ठरणार आहेत.

Web Title: Election chat at the crossroads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.