जलकुंभी काढण्यासाठी निवडणूक विभागाकडे धाव!

By admin | Published: May 25, 2014 12:45 AM2014-05-25T00:45:41+5:302014-05-25T00:49:38+5:30

मोर्णा नदीच्या पात्रातील जलकुंभी काढण्याचा विषय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर!

Election Commission has to pick up the hyacinth! | जलकुंभी काढण्यासाठी निवडणूक विभागाकडे धाव!

जलकुंभी काढण्यासाठी निवडणूक विभागाकडे धाव!

Next

अकोला : मान्सूनपूर्व नाला सफाई व मोर्णा नदीच्या पात्रातील जलकुंभी काढण्याचा विषय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर गेला. सदर काम अत्यंत आवश्यक असल्यामुळे मनपाच्या बांधकाम विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला पत्र देत, परवानगीची मागणी केली आहे. येत्या सोमवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व नाला सफाई करणे अत्यंत आवश्यक असून, याकरिता प्रशासनाने तयारी सुरू केली. शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला अन् आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास महापालिकेला अडचण निर्माण झाली. ही आचारसंहिता २८ जूनपर्यंत कायम राहील. परंतु नाला सफाईसह इतर अत्यावश्यक सुविधा पुरविणे क्रमप्राप्त असल्याने नाला सफाईसह जलकुंभी काढण्याच्या मुद्यावरून बांधकाम विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला परवानगीचे पत्र सादर केले आहे.

Web Title: Election Commission has to pick up the hyacinth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.