आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:54 AM2021-02-20T04:54:17+5:302021-02-20T04:54:17+5:30
अकाेला : अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ संचालक पदांसाठी शनिवारी मतदान हाेणार आहे. त्यापूर्वी १२ संचालकांची अविरोध निवड ...
अकाेला : अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ संचालक पदांसाठी शनिवारी मतदान हाेणार आहे. त्यापूर्वी १२ संचालकांची अविरोध निवड झाली असल्याने उर्वरित संचालकांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीत बिनविराेध नामांकन असलेल्या उमेदवारांची संख्या १२ आहे. यात सेवा सहकारी मतदारसंघ, अनुसूचित जातिजमाती मतदारसंघ, भटक्या जाती-विमुक्त व विशेष मागासवर्गीय मतदारसंघ, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया, औद्याेगिक, मजूर, विणकर, वैयक्तिक भागधारक, आदी मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूक रिंगणात १८ उमेदवार
जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात १८ उमेदवार कायम असून, यात प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा-सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी सहा तालुक्यांतून १३ उमेदवार, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून तीन उमेदवार तसेच पगारदार व इतर सभासद मतदारसंघांतून दाेन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी ११०० मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
या ठिकाणी मतदान केंद्र
संचालक पदाच्या मतदानासाठी १३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक आदर्श कॉलनीतील महापालिका शाळा क्रमांक १६ मध्ये दाेन बूथ, बार्शिटाकळी- गुलाम नबी आझाद महाविद्यालय, अकाेट- श्री भाऊसाहेब पाेटे विद्यालय, तेल्हा- सेठ बन्सीधर विद्यालय, बाळापूर- श्रीमती धनाबाई विद्यालय, पातूर- शाहबाबू उर्दू हायस्कूल, मूर्तिजापूर-श्री गाडगेबाबा विद्यालय, वाशिम- श्री शिवाजी विद्यालय (मेन), रिसाेड- श्री शिवाजी विद्यालय (मेन), मालेगाव- जि.प. उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा, मंगरूळपीर जिल्हा परिषद हायस्कूल, मानाेरा - जिल्हा प्राथमिक शाळा तसेच कारंजा येथील विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश आहे.