मूर्तिजापूर तालुक्यात आजपासून उपसरपंच पदाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:25 AM2017-12-23T01:25:20+5:302017-12-23T01:25:53+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यात डिसेंबर २0१७ ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत मुदत संपणार्या एकूण २७५ ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान व ९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. या ग्रामपंचायतींची प्रथम सभा व उपसरपंचपदाची निवडणूक २३, २४, २८ व २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची प्रथम सभा व उपसरपंचपदाची निवडणूक होणार असून, याबाबत जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर रोजी ११ ग्रामपंचायतीची प्रथम सभा व उप-सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सांगवा (मेळ), सालतवाडा, सोनोरी, मंदुरा, मधापुरी, राजनापूर, बोरगाव निघोट, रंभापूर, खरब नवले, शिवण खुर्द, कानडी, शेरवाडी, भगोरा येथे २४ डिसेंबरला शेलुनजीक, जांभा बु., समशेरपूर, हिवरा कोरडे, माना, खोडद, वडगाव, राजुरा सरोदे, वाई (माना), सोनाळा, बिडगाव येथे, २८ डिसेंबर रोजी मुंगशी, दातवी, जांभा खुर्द, कोकसरा, सांजापूर, बोर्टा, पोही, नवसाळ, नागोली मोझर, धनोरा वैद येथे तर २९ डिसेंबर रोजी विरवाडा, दाताळा, रेपाडखेड, खापरवाडा, दापुरा, येंडली, ब्रम्ही खुर्द, लोणसना, रामटेक, अकोली जहागीर, जितापूर खेडकर, दहातोंडा, मुरंबा, आरखेड, उमरी अरब, धोत्रा शिंदे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.नवीन धोरणानुसार उपसरपंच निवडणुकीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी नव्याने निवडून आलेले सरपंच राहतील. या कामात ग्रामपंचायत सचिव त्यांना मदत करणार आहेत. ज्या ठिकाणी सरपंच निवडून आलेला नाही, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विद्यमान उपसरपंच हेच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी राहतील.