निवडणुकाच जिकंल्या; शेतकऱ्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न हवेतच विरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 03:06 PM2019-10-29T15:06:42+5:302019-10-29T15:07:02+5:30
शेतकºयांनी मतदानरू पी दान राजकीय पक्षाच्या झोळीत टाकून सत्ताधाºयासह विरोधकांनाही तारले.
- राजरत्न सिरसाट,
अकोला: शेतकºयांचे जीवन-मरणाचे प्रश्न, समस्या हवेतच विरल्या. अखेर निवडणुकाच जिंकल्या, असेच म्हणावे लागेल. शेतकरी आत्महत्या वाढल्या, विषबाधेचे प्रकार घडले, पीक कर्ज, दुष्काळी मदत मिळाली नाही, कर्जमुक्ती अधांतरीच आहे, अशा अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करीत असताना पावसामुळे हाती आलेल्या पिकाचेही नुकसान झाले; पण हे सर्व विसरू न शेतकºयांनी मतदानरू पी दान राजकीय पक्षाच्या झोळीत टाकून सत्ताधाºयासह विरोधकांनाही तारले. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
असा एक दिवस उजाडत नाही, की ज्या दिवशी शेतकºयाने आत्महत्या केली नाही. यामागील कारणही गंभीर आहे. गत १५ वर्षांत उत्पादनही होत नसल्याने शेतकºयांच्या हातात पैसाच शिल्लक राहत नाही. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर तर मिळतच नाही. परिणामी, मुला-मुलींचे लग्न, शिक्षणाचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी पैसा आणणार कुठून, म्हणून कर्ज हा पर्याय समोर असतो. राष्ट्रीयीकृत बँका उभ्याही करीत नसल्याने शेवटी त्यांना खासगी सावकारांची उंबरठे झिजवावी लागतात. मग चक्रवाढीने व्याजाचा तगादा मागे लागतो. कर्जाचा डोंगर उभा राहतो. हातात पैसाच राहत नसल्याने शेत विकावे लागते. या गलितगात्र झालेल्या स्थितीत सावकार दारात उभा झाला की सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो, अशा अनेक कारणांमुळे मग शेतकरी शेवटी आत्महत्येला कवेत घेत आहेत.
या सर्व गंभीर बाबींची या निवडणुकीत साधी चर्चाही झाली नाही. निवडणुकीपूर्वीपासून पाऊस सुरू आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पिके उद्ध्वस्त झाली; पण सरकारने याकडे बघितलेच नाही किंवा अगोदरचअधिकाºयांना सूचनाही केल्या नाहीत. विरोधी पक्षानेहीदेखील ठोस भूमिका घेतली नाही. केवळ शेतकºयांच्या प्रश्नाचे भांडवल करू न सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. आचारसंहितेत शेतकºयांचे प्रश्न मागे पडले. बँकांनी खरीप तर सोडा रब्बीचे पीक कर्जही पूर्ण दिले नाही. शेती सिंचनाला पाणी मिळावे, हे गांभीर्याने घेतले नाही, तरीपण या जगाच्या पोशिंद्याने सरकारला मात्र निवडले आहे.
जाहीरनाम्यात शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे असूनही ते झाले नाही, तरीही मतदारांनी आपला प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजावला. आता तरी शेतकºयांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. विश्वासघात करू नये, सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, घोषणा अमलात आणाव्या.
महादेवराव भुईभार,
कृषी कीर्तनकार.
ओला दुष्काळ असताना याची कोणत्याच पक्षाने साधी चर्चाही केली नाही. विरोधी पक्षाने मजबुतीने ठोस भूमिका घेतली नाही. केवळ राजकीय भांडवल करीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. या सरकारने पगारदारांना दिवाळी आधी खूश केले. बोनस दिलापण काय, त्यांची दिवाळी मात्र या सर्व अंधारमय गर्तेत जाणार आहे.
- डॉ. प्रकाश मानकर,
चेअरमन,
महाराष्टÑ कृषक समाज.
निवडणुकीत शेतकºयांच्या प्रश्नावर सत्ताधाºयांनी उच्चार केला नाही. म्हणूनच विद्यमान आणि ज्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली, त्यांच्याकडे शेतकºयांनी पाठ फिरविली. शेतकºयांचे गंभीर प्रश्न आहेत. त्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.
- ललित बहाळे,
शेतकरी नेते, शेतकरी संघटना.