विद्युत दाब वाढला; घरातील उपकरणे जळाली

By Admin | Published: May 18, 2014 12:49 AM2014-05-18T00:49:36+5:302014-05-18T00:50:53+5:30

अकोला शहरातील काही भागात अचानक विद्युत दाब वाढल्याने शेकडो नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली.

Electric pressure increased; Indoor equipment burnt | विद्युत दाब वाढला; घरातील उपकरणे जळाली

विद्युत दाब वाढला; घरातील उपकरणे जळाली

googlenewsNext

अकोला : शहरातील कोठारी वाटिका तसेच अन्य भागात शुक्रवारी व शनिवारी अचानक विद्युत दाब वाढल्याने शेकडो नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली. यामुळे नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोठारी वाटिकेत सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान नागरिकांच्या घरांमधील टि.व्ही., फ्रीज, कुलर यांच्यासह महागडे विद्युत उपकरणे सुरू होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यामुळे नागरिक टि.व्ही. पाहण्यात मग्न होते. यावेळी अचानक रोहित्रावरून विद्युत दाब वाढला. त्यामुळे घरातील उपकरणे जळाली. शेकडो घरातील टि.व्ही. बंद पडले आहेत. गत दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात विद्युत दाब वाढत असल्यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणांचे नुकसान होत आहे.

Web Title: Electric pressure increased; Indoor equipment burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.