मनात्री येथे विद्युत रोहित्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:07+5:302021-02-23T04:28:07+5:30
मनात्री येथील बसस्थानकासमोर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या रोहित्रावरून होणारा ...
मनात्री येथील बसस्थानकासमोर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या रोहित्रावरून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. (फोटो)
----------------------
तळेगाव येथे शिवजयंती उत्साहात
मनात्री: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच लालसिंगभाऊ डाबेराव, उपसरपंच रेखा मात्रे, ग्रामपंचायत सदस्य गणेश इंगळे, सचिव एस. एल. सोनोने, संदीप ताथोड, प्रहार सेवक तथा तालुकाध्यक्ष अपंग जनता दल संघटना ज्ञानेश्वर गव्हाळे, रामदास इंगळे, संजय इंगळे, दादाराव नेमाडे , ज्ञानेश्वर सरप, गजानन मेसरे, रामभाऊ मात्रे, पुरुषोत्तम पाचपोर आदी उपस्थित होते. (फोटो)
-----------------------------
पारस येथे शिवजयंती उत्साहात साजरी
पारस: येथील जि.प. प्राथमिक मराठी कन्या व मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी कन्या शाळेचे मुख्याध्यापक गजानन करांगळे हे होते. कार्यक्रमास प्रामुख्याने मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणोती सोनचळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमात कृष्णा सिरस्कार याने मनोगत व्यक्त केले. यावेळी कन्या शाळेतील विद्यार्थिनी उत्कर्षा उमाळे हिने बाल शिवबाची तर गौरी इंगळे हिने राजमाता जिजाऊ यांची वेषभूषा साकारली होती. प्रतिमापूजनानंतर बालशिवबाला अश्वारूढ करून शालेय परिसरात प्रदक्षिणा मारण्यात आल्या. सोबत जिजाऊ आऊसाहेब तसेच मावळ्यांच्या वेषभूषेतील ऋषिकेश खेरडे, दर्शन करांगळे ,विराज अहिर, कृष्णा सिरस्कार चालत होते. त्यानंतर दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक तसेच उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शिवरायांचा जयजयकार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक विजय अहिर, निलेश गिर्हे, विभुती हाडोळे, प्रीती झापर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी गीता धरमकार, संतोष धरमकार, चैतन्य मडावी, नैतिक सावंत, सोहम गाडगे, स्वरा भड, भवाने इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गिऱ्हे यांनी तर विजय अहिर यांनी आभार मानले. (फोटो)