साडेदहा लाखांची वीज चोरी उघड!

By admin | Published: September 5, 2016 02:42 AM2016-09-05T02:42:44+5:302016-09-05T02:42:44+5:30

महावितरणची कारवाई; दंड ठोठावला.

Electricity bill of 10 and half lakhs exposed! | साडेदहा लाखांची वीज चोरी उघड!

साडेदहा लाखांची वीज चोरी उघड!

Next

अकोला, दि. ४ : महावितरणच्या भरारी पथकाने गत आठवड्यात अकोला परिमंडळांतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये गत आठवड्यात राबविलेल्या अभियानात एकूण १0 लाख ५0 हजारांची वीज चोरी उघडकीस आली आहे. या कारवाईत तीन जिल्हय़ांमध्ये ३५ जण थेट वीज चोरी करताना आढळून आले असून, महावितरणने त्यांना दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणे अपेक्षित असते; परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणे आदी प्रकारातून वीज चोरी करतात.
तसेच काही ग्राहक विजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येते. गत २२ ते २४ ऑगस्ट रोजी महावितरणचे भरारी पथक व स्थानिक अभियंत्यांनी अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये छापे टाकले. या कारवाईदरम्यान थेट चोरी करणारे ३५ जण आढळून आले. अकोला जिल्हय़ात १0, बुलडाणा जिल्हय़ात १0 व वाशिम जिल्हय़ात १५ जण वीज चोरी करताना आढळून आले. भारतीय वीज कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत (थेट वीज चोरी) त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Electricity bill of 10 and half lakhs exposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.