अकोला जिल्ह्यात वीजबिल भरणा केंद्रे सुरु; मिटर रिडींग, बील वितरणास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:10 AM2020-06-05T10:10:47+5:302020-06-05T10:11:11+5:30
जिल्हयात महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू करून ग्राहकांची वीजबिल भरण्याची अडचण दुर करण्यात आली आहे.
अकोला : जिल्हयात महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू करून ग्राहकांची वीजबिल भरण्याची अडचण दुर करण्यात आली आहे. तसेच यापुढे जिल्हयातील कंन्टेनमेंट क्षेत्र वगळता इतर वीज ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी ग्राहकांचे मीटर वाचन करण्याबरोबरच वीज बिलाचे प्रीटींग करून ते वितरीतही करण्याचे निर्देश अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वीज बिल भरणा केंद्रे बंद करण्यात आले. होते. यासोबतच ग्राहकांचे मीटर वाचन , वीज बिलाचे प्रीटींग आणि वितरणही बंद करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार महावितरण मुख्य प्रशासनाने आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या निदेर्शाच्या अधिन राहून फिजिकल डिस्टंन्सिंग नियमाचे काटेकोर पालन करत, अकोला जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आपल्या वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटर वाचन,बिल प्रीटींग आणि वीज बिलाचे वितरण करण्याबरोबरच वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल स्विकृतीची परवानगी देण्यात आली असल्याने यापुढे वीज ग्राहक महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर आपले वीज बिल भरू शकतात.
प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम
पण सुरक्षेच्या दृष्टीने शासनाचे पुढील आदेश येयीपर्यंत जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोन मधील ग्राहकांचे मीटर वाचन करण्यात येणार नाही. तसेच त्यांना वीज बिल वितरीत करण्यात येणार आहे.त्यामुळे या झोन मधील वीज ग्राहकांना अचूक वीज मिळण्यासाठी महावितरणचे मोबाईल एप डाऊनलोड करून स्वत: आपल्या वीज मिटरची रिडींग पाठविणे गरजेचे आहे. तसेच या भागातील वीज बिल भरणा केंद्रेही बंद राहणार आहेत.ं
मिटर रिडींग करणाऱ्यांना नियमांचे पालन बंधनकारक
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याची काळजी घेत मीटर वाचन एजन्सिंच्या सभासदांना महावितरणच्या वतिने ओळख पत्र देण्यात येणार आहेत, याशिवाय त्यांना हँड ग्लोज,चेहऱ्यावर मास्क बांधने,सोबत सॅनिटाईजर ठेवणे यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य सेतू एप डाऊनलोड करून त्यात माहिती भरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय हरकत असलेल्या ग्राहकांचे मीटर वाचन करण्यात येणार नाही. असे असले तरी ग्राहकांनीही सोशल डिस्टंन्सिंग पाळत सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मीटर रिडरचे ओळखपत्र तपासूणच मीटर वाचनाची परवानगी द्यावी असे आवाहन महावितरण अकोल जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.