अकोला परिमंडळात वीज बिलाची थकबाकी ५०५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 10:34 AM2021-01-16T10:34:08+5:302021-01-16T10:34:39+5:30

MSEDCL News वीज बिलाची एकूण थकबाकी ही ५०५ कोटींवर गेली आहे.

Electricity bill Pendings in Akola circle at Rs 505 crore | अकोला परिमंडळात वीज बिलाची थकबाकी ५०५ कोटींवर

अकोला परिमंडळात वीज बिलाची थकबाकी ५०५ कोटींवर

Next

अकोला : महावितरण  कंपनीची केवळ अकोला परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा आणि नगरपालिका, महानगपालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलाची एकूण थकबाकी ही ५०५ कोटींवर गेली आहे. त्यामुळे महावितरणचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी वीज ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

लॉकडाऊननंतर डिसेंबर २०२० अखेर परिमंडळातील वीज ग्राहकांकडे वाढलेल्या एकूण ५०५ कोटी १७ लाख रुपयांच्या थकबाकीमध्ये घरगुती ग्राहकांकडे २९८ कोटी ४० लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे ४७ कोटी ४ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ४५ कोटी ४९ लाख, पाणीपुरवठा योजनांकडे ९७ कोटी ७१ लाख आणि नगरपालिका, महानगरपालिकाकडील पथदिव्यांचे १६ कोटी ५३ लाख रुपयांचा समावेश असल्याची माहिती महावितरणने दिली आहे

Web Title: Electricity bill Pendings in Akola circle at Rs 505 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.