एकाच दिवशी ३९८ ठिकाणी पकडल्या वीजचोर्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 08:29 PM2017-08-11T20:29:30+5:302017-08-11T20:29:56+5:30
अकोला : वीज चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताना महावितरणच्या विशेष पथकाने गुरुवार, १0 ऑगस्ट रोजी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तब्बल ३९८ ठिकाणी आकस्मिक छापे मारून ८ लाख ३३ हजार ५५६ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ८४ लाख ४१ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे ३९८ जणाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असताना वीजचोरीमुळे महावितरणला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या निदेर्शानुसार मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्यासह अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, विनोद बेथारीया व गुलाबराव कडाळे यांचेसह कार्यकारी अभियंते, अभियंते अधिकारी व जनमित्र मिळून जवळपास ७00 जणांचा या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग होता.
वीजमीटर मध्ये हस्तक्षेप करून व वीज तारांवर आकोडे टाकून थेट वीजचोरी केली जात होती अशांविरुद्ध् कारवाई करण्यात आली, यामध्ये अकोला मंडळामध्ये ९७, बुलडाणा मंडळ १६२, तर वाशिम मंडळामध्ये ६८ अशी एकूण अकोला परिमंडळामध्ये ३९८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांनी जवळपास ८ लाख ३३ हजार ५५६ युनिटची म्हणजे जवळपास ८४ लाख ४१ हजार रुपयांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आले यातील अकोला मंडळामध्ये २६, बुलडाणा मंडळ ३६, तर वाशिम मंडळामध्ये ९ याप्रमाणे अकोला परिमंडळामधे एकून ७१ ठिकाणी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यापूर्वी नुकत्याच अकोला परिमंडळामध्ये वीजचोरी विरुद्ध झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४५ व ४२ अशा एकूण ८७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामुहिकरित्या दरमहा आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.