विद्युत जोडण्यांच्या घोळाची होणार चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:56 AM2017-09-30T00:56:07+5:302017-09-30T00:56:21+5:30
एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागांमध्ये विद्युत मीटरचा तुटवडा असल्यामुळे नवीन ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात कमालीची दिरंगाई होत अस ताना दुसरीकडे मात्र अनेक वीज ग्राहकांनी नियमांना डावलून एकाच घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या घेतल्या आहेत. एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने नवीन वीज जोडणी घेण्यासाठी ग्राहकांना प्रचंड हेलपाटे घ्यावे लागत आहे त. रीतसर अर्ज करून पैसे भरल्यानंतरही जोडणीसाठी अनेक दिवस ‘वेटिंग’वर राहावे लागते. तांत्रिक बिघाड असलेले मीटर बदलण्यासाठी अर्ज करणार्या ग्राहकांना तर तीन-तीन महिने ‘वेटिंग’वर राहावे लागते. एकीकडे नवीन जोडण्यांसाठी रीतसर अर्ज करणार्यांना ‘वेटिंग’वर ठेवणे, तर दुसरीकडे मात्र ‘अर्थ पूर्ण’ व्यवहार करणार्यांना एकापेक्षा अधिक जोडण्या देणे, असे प्रकार सुरू आहेत. महावितरणच्या नियमानुसार एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक घरगुती वीज मीटर घेता येत नाही. वाणिज्यिक जोडण्या मात्र कितीही घेता येतात. एकाच घरात एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घ्यायच्या असतील, तर त्यासाठी घराची विभागणी झालेली असणे गरजेचे आहे. महावि तरणच्या कर्मचार्यांच्या ‘मिलीभगत’ने अनेक वीज ग्राहकांनी वीज वापराच्या कमी दराच्या ‘युनिट स्लॅब’चा फायदा मिळावा, या हेतूने एकाच जागेवर एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या घेतल्या आहेत.