थकबाकी वसुलीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:28 PM2019-03-23T16:28:40+5:302019-03-23T18:02:29+5:30

खेट्री (जि. अकोला) : थकीत वीज देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाºयास विजग्राहकाने मारहाण केल्याची घटना शनिवारी २३ मार्च रोजी गावंडगाव येथे घडली.

electricity costemer beat msedcl employee | थकबाकी वसुलीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

थकबाकी वसुलीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

Next


खेट्री (जि. अकोला) : थकीत वीज देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाºयास विजग्राहकाने मारहाण केल्याची घटना शनिवारी २३ मार्च रोजी गावंडगाव येथे घडली. सस्ती येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता डी. के. कंकाळ आपल्या पथकासह थकित विद्युत बिल वसुली करण्यासाठी शनिवारी गावंडगाव येथे गेले होते. गावातील उमेश शेषराव चव्हाण यांच्याकडे थकबाकी वसुलीसाठी पथक गेले असता, त्याने वीज बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे पथकाने वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईला सुरुवात करताच उमेश चव्हाण याने लाईनमन मंगेश वासुदेव गवई याला काठीने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे पथकातील कर्मचाऱ्यां थेट चान्नी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. लाईनमन मंगेश वासुदेव गवई यांच्या फिर्यादीवरून गावंडगाव येथील उमेश शेषराव चव्हाण याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
लाईनमन मंगेश वासुदेव गवई, याला आरोपीने मारहाण केल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.



थकबाकीदार ग्राहकाने थकबाकी भरण्यास मनाई केल्यामुळे त्याच्याकडील विद्युत मीटर काढण्याची कारवाईला सुरुवात केली असता आरोपीने लाईनमनला काठीने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
- डी. के कंकाळ, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती

Web Title: electricity costemer beat msedcl employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.