कृषीपंप वीज बिल दुरुस्तीसाठी महावितरण घेणार मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 05:51 PM2017-12-30T17:51:07+5:302017-12-30T17:53:43+5:30
अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, वीज बिलांच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरलेले नाही अशा कृषीपंप ग्राहकांना तात्काळ जागेवरच वीजबिल दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े वीज बिल दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत.
अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, वीज बिलांच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरलेले नाही अशा कृषीपंप ग्राहकांना तात्काळ जागेवरच वीजबिल दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े वीज बिल दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत. येत्या १ जानेवारीपासून या मेळाव्यांची व्याप्तीे वाढविण्यात येणार आहे.
महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाºया कृषीपंप धारकांनी त्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरीत होण्याच्या दृष्टीने तक्रार असलेल्या बिलाची प्रत किंवा ग्राहक क्रमांक व मीटरवरील चालू रिडींगची नोंद सोबत आणण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. या मेळाव्यात तक्रारींची खातरजमा करून सुधारीत बिल जागेवरच देण्यात येणार आहे.
महावितरणच्या विविध उपविभागिय कार्यालयांत या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७’ मध्ये तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा करून सहभागी झालेल्या कृषीपंप ग्राहकांने वीज बिल दुरुस्तीसाठी अर्ज केला असेल तर त्याचा वीजपुरवठा योजनेतील तरतुदींप्रमाणे पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत खंडीत करण्यात येऊ नये. मात्र ज्या ग्राहकांनी सवलतीच्या दराने सुद्धा तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा केला नसेल अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा अशासुचनाही महावितरणतर्फे संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
वीज बिलांची दुरुस्ती करीत असताना ग्राहकाचा मंजूर आणि जोडलेला विद्युत भार, मीटरवरील वीज वापराची नोंद, वाहिनीवरील वीज वापराचा निदेर्शांक, वीज वापराचे तास आदी बाबी संबंधित उपविभागीय कार्यालयांनी विचारात घ्याव्यात, याशिवाय संबंधित कार्यकारी अभियंता यांनी रोहीत्रावरील सर्व कृषीपंप धारकांनी थकीत वीज देयकातील तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा केला असल्यास सदर नादुरुस्त रोहीत्र तीन दिवसाच्या आत अग्रक्रमाने बदलून देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत पहिला हप्ता व त्यानंतरच्या सर्व हप्त्यांचा भरणा करण्याच्या मुळ मूदतीत तीन महिने वाढही देण्यात आली आहे.
कृषीपंप ग्राहकांनी आपल्या वीजबिलांत आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेत मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.