अकोला परिमंडळात २१ लाखांच्या वीज चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:59 PM2017-08-05T13:59:05+5:302017-08-05T14:02:02+5:30

electricity thept detected in akola zone | अकोला परिमंडळात २१ लाखांच्या वीज चोरी उघड

अकोला परिमंडळात २१ लाखांच्या वीज चोरी उघड

Next
ठळक मुद्देसंपूर्ण विदर्भात विशेष मोहीम एकूण ६५ लाखांची वीज चोरी उघड




अकोला : वीज चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताना महावितरणच्या दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये ४५ हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करून त्यापैकी २५ ठिकाणी झालेली तब्बल २१ लाख ८२ हजार ८३८ रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली.
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीतील दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने १० ते १५ जुलै २०१७ दरम्यान संपूर्ण विदर्भातील हॉटेल्स आणि ढाब्यांच्या वीज जोडणीची विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २०९ ठिकाणी तपासणी करण्यात येऊन त्यात तब्बल ६५ लाख ८५ हजार ६७४ रुपये मूल्याच्या वीज चोºया आणि वीज वापरातील अनियमितता असलेली ८७ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने १० ते १५ जुलै या कालावधीत विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील २०९ हॉटेल्स आणि ढाब्यांवरील वीज जोडण्यांची तपासणी केली. त्यापैकी अकोला मंडळात २२, बुलडाणा १६, वाशिम व यवतमाळ प्रत्येकी ७, अमरावती १५, नागपूर शहर मंडळात २५, नागपूर ग्रामीण मंडळात १२, भंडारा ३०, वर्धा २१, चंद्रपूर २३, गोंदिया २० आणि गडचिरोली मंडळातील ११ अशा एकूण ८७ ठिकाणी वीज चोºया आणि वीज वापरातील अनियमितता आढळल्या.
अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर राजरोसपणे विजेचा गैरवापर आणि अनधिकृत वापर होत असल्याचे ऐकीवात असल्याने त्यांच्यावर सर्वत्र एकाच वेळी कारवाई करण्याच्या निर्णय प्रादेशिक उपसंचालक, दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी नागपूर यांनी घेतला आणि त्यादृष्टीने विदर्भातील १२ मंडळातील भरारी पथकांना आवश्यक ते दिशानिर्देश देत ही कारवाई करण्यात आली. या ८७ पैकी ५२ प्रकरणांत भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये थेट वीज चोरी, तर पाच ठिकाणी कलम १२६ अन्वये विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळले. याशिवाय ३७ ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आल्या.
विजेच्या अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, ग्राहकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच वीज वापर करावा, ज्या कारणांसाठी वीज मीटर घेतले, त्याचसाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: electricity thept detected in akola zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.