अकोल्यात सहा दिवसांत ३३ लाख ८० हजारांची चोरी उघड; ३९६ जणावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:27 PM2018-08-24T18:27:28+5:302018-08-24T18:30:34+5:30
अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात कारवाईचा बडगा उगारत महावितरणच्या पथकाने जिल्ह्यात ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ३३ लाख ८० हजारांची वीज चोरी उघडकीस आणली.
अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात कारवाईचा बडगा उगारत महावितरणच्या पथकाने जिल्ह्यात ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ३३ लाख ८० हजारांची वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तिनही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार ३७२ जणांवर तर कलम १२६ नुसार २४ ग्राहकांवर अशा एकूण ३९६ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागातील ६७, अकोट विभागातील ८३, तर अकोला ग्रामीण विभागातील २२२ अशा एकून ३७२ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली, यातील ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या अकोला शहर विभागातील ०४, अकोट विभागातील ०१, तर अकोला ग्रामीण विभागातील १९ अशा एकून २४ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.
यापूवीर्सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये अनेकवेळा वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये कारवाई करण्यात आली. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा सहभाग
मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या निदेर्शानुसार अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते प्रशांत दाणी (अकोला शहर), प्रमोद काकडे(अकोट) तसेच गजेंद्र गडेकर (अकोला ग्रामीण) यांचेसह विविध पथकामध्ये १६३ अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.